शिव गोरक्ष शाळेचे भूमिपूजन

hero

शिव गोरक्ष गोशाला हि 2022 पासुन श्रीगोंदा पेडगाव रोड येथे स्थापीत करण्यात आलेली आहे. हि गोशाळा सुरु करण्याचे मुळ ऊद्देश्य म्हणजे श्री राजेश सावंत ह्यांनी मुळात बालपण खेडेगावात घालवीले आहे व दुभ्त्या गायींना त्यांचा ऊपयोग संपल्यावर सोडुन देणे अथवा कत्तल खाण्यावर चर्म ऊद्योगाकरीता विक्री करणे पसंत नव्हते. त्या मुक्या प्राण्याचे दु:खाची जाणिव होऊन त्यांनी सद्य परिस्थितीत जे शक्य असेल त्या रित्या गौशाळा सांभाळण्याचे निर्धार केला. शहरामध्ये गायींचे प्रमाण कमी आहे. अध्यात्मात गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे आजही गायींचे पूजन करण्यात येते. गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्या असल्या तर अनेकांतर्फे त्यांना मोकळ्यावर सोडून देण्यात येते किंवा गो-शाळेत दान दिले जातात. अशा गायींवर उपचार करणे, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी ऐक प्रांजळ विचार मनात ठेवुन ही गौशाळाची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या ही गौशाळा शिशु अवस्थेत आहे जिथे येत्या भविष्यकाळात तिला पुर्णपण विकसित गौशाळेत रुपांतर करावयचे ह्या संस्थेचे ध्येय आहे.


blog
blog
blog

राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,संचलित राष्ट्रीय संत गाडगे महाराज अनुसूचित जाती जमाती बाल संगोपन व शिव गोरक्ष शाळाचे भूमिपूजन .....

श्रीगोंदा वार्ताहर - नितीन रोही

राजेश सावंत बोलताना म्हणाले आम्हाला बरेच वेळोवेळी लायन्स क्लब ऑफ मिलीनियम अहमदनगर व अम्मा भगवान फाउंडेशन यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले भटक्या समाजातील अनुसूचित जाती जमातीतील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांनी चांगलं प्रकारचे शिक्षण घेऊन एक समाजातील चांगले घटक व चांगला व चांगले नागरिक बनाव तसेच भटके समाजातील अनुसूचित जाती जमातीतील लोकांना रेशन कार्ड घरकुल योजना श्रावणबाळ योजना गायरान जमिनी उपलब्ध करून देणे रस्ता पाण्याची सोय व संचालये उभारणे व इतरही शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे इतक्या रिकामे राजा हरिश्चंद्र सेवाभावी संस्था व राष्ट्रीय संत गाडगे महाराज अनुसूचित जाती जमाती संगोपन केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.


अनाथ भटक्या समाजातील तसेच अनुसूचित जाती जमातीतील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राजा हरिश्चंद्र सेवाभावी संस्था व राष्ट्रीय संत गाडगे महाराज अनुसूचित जाती जमाती अनाथ संगोपन उभारण्यात आले आहे त्याचबरोबर विजय माळी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर यांनी सामाजिक क्षेत्रातील राजकीय राजकीय क्षेत्रातील समाजसेवी संस्था दानशूर व्यक्ती यांना मदतीचे आवाहन केले.


blog
blog

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी मनोहर पोटे,नगरसेवक सतीश मखरे, हरीश हरवणी(लायन्स कलबअध्यक्ष) निलेश नल्ला (लायन्स क्लब मा.अध्यक्ष),राजू गुरुनानी (मा.अध्यक्ष),विजय माळी(मा. अध्यक्ष), महेश पाटील (मा.अध्यक्ष), हेमंत नरसाळे (मा.अध्यक्ष), मनोज राजापूर (समाज सेवक), आप्पा सोनवणे (महाराष्ट्र रत्न पुरस्कार) त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र बापू सावंत,उपाध्यक्ष अरुण भगवान शिंदे,सचिव अनिल विश्वनाथ चौगुले, खजिनदार शिवनाथ शिंदे, राधिका दीपक रणभोर, मार्गदर्शिका रोहन नायडू,भारत शिंदे,तानाजी सावंत,संजय भीमराव सावंत, सुरेश शिवाजी शिंदे (राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राष्ट्रीय संत गाडगे महाराज अनुसूचित जाती जमाती बालसंगोपन सदस्य) आणि भटके समाजातील सर्व समाज बांधव व माता-भगिनी उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण शिंदे यांनी केले तर आभार सुरेश शिवाजी शिंदे मानले.


राजेश सावंत हे पोलीस दलात येरवडा झेल येथे कार्यरत असून सतत गोर गरिबांसाठी झटत असतात. सावंत यांची इतर नागरिकांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रेरणाघ्यावी.